भजन
येइ रे भोळिया !
भेट झडकरी ।
पाहु दे डोळिया
मूर्ति गोजिरी ॥धृ॥
कुंजविहारी ! गिरिवरधारी !
मनमोहन ! राधा-मनहारी
! ॥भोळिया ! ० ॥१॥
या भवधारी, मन दुःखारी ।
तुजविण कोण दुजा
कैवारी ? ॥॥भोळिया ! ० ॥२॥
मधुर बासरी, ऎकवि तारी ।
तुकड्यादासा आज निवारी ॥भोळिया ! ० ॥३॥
