Type Here to Get Search Results !

भजन - पाहतोसि अंत काय, नंद-नंदना रे ! ॥

0

 

भजन

पाहतोसि अंत काय, नंद-नंदना रे ! ॥धृ॥


दीन अम्ही घाबरलो, भवचक्री सापडलो ।

सुखम्हणुनी गडबडलो, ऎक वंचना रे ॥१॥


पाहुनि जनि सृष्टि-खेळ, नटलो बहु करुनि मेळ ।

खोवियली ऎसी वेळ, कोणि ना सखा रे ! ॥२॥


सोसियले दुःख किती, परि येईना सुमती ।

अंतकाळि काय गती, होइल गिरिधारे ! ॥३॥


बुध्दि दे अम्हास अता, लागू तव नाम पथा ।

होउ नकोसी परता, देइ दर्शना रे ! ॥४॥


वेळ गेलिया निघून, काय पाहशी दुरून ?

तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देइ बारे ! ॥५॥




Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.