Type Here to Get Search Results !

भजन - असं वेड लावशिल कधी ? मी विसरिन माझी सुधी ॥

0

भजन


 असं वेड लावशिल कधी ?

मी विसरिन माझी सुधी ॥धृ॥

 

तुज वाचुनि कवणा रुसू ?

गे माय ! कुणाला पुसू ? ॥१॥


हा देह मीम्हणता भला,

स्वात्मता न उरली मला ॥२॥


संशयी वृत्ति पाहुनी, अग !

लाज वाटते मनी ॥३॥


नच विरे गर्व बापुडा,

सोडिचना अपुला धडा ॥४॥


जाणीव वाढली जरी,

तरि अंधपणा वावरी ॥५॥


तुकड्यास ठाव दे अता,

नच भासो देहात्मता ॥६॥




Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.