भजन
तुझे सगुण रूप ध्यावे । माधवा ! केशवा !
ध्यावे तुला जीवभावे ॥धृ॥
मोरमुकुट साजिरा, धरुनी कटासी करा ।
पीतांबर पिवळा, विटेवरी लक्ष द्यावे ॥१॥
मूर्ती दिसे सावळी, शोभे तुळशी गळी ।
लागे मना आवडी, वाटे सदा नाम गावे ॥२॥
नको कुणी साधना, तूची असो मन्मना ।
तुकड्याची ही भावना, संती सदा टिकवावे ॥३॥
