Type Here to Get Search Results !

भजन - अखिल विश्व मंदिर माझ्या आत्ममूर्तिचे

0

भजन

 (चालः आकळे न अरघटित...)

अखिल विश्व मंदिर माझ्या आत्ममूर्तिचे ।
खेळ हे निसर्गे   त्याच्यां   कार्य - पूर्तिचे ।।धृ०।।

वाहती नदी-सागर हे, स्नान घालण्या तयासी।
पृथ्वि हेच सिंहासन  त्या   चक्रवर्तिचे ॥ माझ्या0।।१।।

वसंतबाग फुलला फलला, हार अर्पिण्या तयासी ।
सुगंधित चंदनकाष्ठे, गंध हे    पुजेचे || माझ्या0 ।।२।।

पृथ्वि अन्न शिजले जे जे, भोग द्यावयास यासी ।
जळति द्रव्य-धातू सगळे,हवन होतसे।। माझ्या0।।३।l

सूर्यचंद्र नंदादिप हे, जळति ज्योत द्यावयासी ।
पवन मंद वाहे सुखवी, हृदय हे तिचे ।। माझ्या 0।।४॥

निर्विकल्प चिद् आत्मा हा, भोगुनी अभोक्ता राही ।
दास सांगतो तुकड्या हे भाव स्फूर्तिचे।। माझ्या0।।५।l



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.